ब्रेड उपमा कृती - न्याहारीची सोपी रेसिपी

ताजी / उरलेली / पांढरी / ब्राऊन ब्रेड वापरा
याला ब्रेडची भाजी - ब्रेडचा कुस्करा असेही म्हणतात

ही ब्रेड उपमा कृती सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. सकाळची न्याहारी म्हणून, स्नॅक म्हणून किंवा लंच बॉक्ससाठी देण्यासाठी योग्य पदार्थ आहे हा. याला 'ब्रेडची भाजी' किंवा 'ब्रेडचा कुस्करा' असेही म्हणतात.

आपण नेहमी वापरत असलेली पांढरी ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेड वापरू शकतो. घरी ब्रेड असेल तेव्हा आपण हे 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात बनवू शकता. तयारी उपमा सारखीच आहे.

Bread upma - Bread bhajiBread upma - Bread bhaji

आपण ताजी ब्रेड वापरू शकता किंवा यासाठी एक दिवसांची जुनी ब्रेड वापरली जाऊ शकते. आपण क्रस्टसह ब्रेडच्या स्लाइस वापरता येतात .

या उपमामध्ये भरपूर भाज्या घालता येतात. कांदा आणि टोमॅटो बरोबर (जे मी वापरत आहे), आपण हवे असल्यास बटाटे, हिरवे वाटाणे, ढोबळी मिरची, फुलकोबी देखील घालू शकता.

आपल्या आहारात भाज्याचे प्रमाण वाढवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. लहान मुलांनाही ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा खूप आवडते.तर आता आपण ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा कसा करायचा ते पाहू चला.

Ready bread upmaतयार ब्रेड उपमा

ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा कसा करायचा

ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा साठी लागणारे साहित्य

 • ब्रेडचे तुकडे/स्लाइस - आठ किंवा दहा - लहान तुकडे करुन .
 •     कांदा - १ कप बारीक चिरून
 •     टोमॅटो - १/२ कप चिरलेला.
 •     हिरवी मिरची - अर्धा किंवा १/२ टीस्पून मिरची पेस्ट किंवा दोन तीन मिरच्या , चवीप्रमाणे
 •     आले - बारीक चिरून किंवा पेस्ट - १/२ टीस्पून
 •     मीठ - 1 टीस्पून
 •     साखर - 1 टीस्पून
 •     कढीपत्ता - आठ किंवा दहा पाने
 •     कोथिंबीर - १ टेस्पून चिरलेली.

हेही घालू शकता :

- चिरलेल्या भाज्या जसे ढोबळी मिरची, हिरवे वाटाणे, चिरलेली गाजर, फुलकोबी इ.


फोडणी साठी साहित्य

 •     तेल - 2 चमचे
 •     मोहरी दाणे -1/2 टीस्पून
 •     जिरे - १/२ टीस्पून
 •     हळद - १/२ टीस्पून
 •     हिंग - १/4 टीस्पून

ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा करण्याची पद्धत:

ब्रेड उपमा साठी साहित्यब्रेड उपमा साठी साहित्य
ब्रेडचे तुकडे व उपमा साहित्यब्रेडचे तुकडे व उपमा साहित्य

चला करूया ब्रेड उपमा - ब्रेडची भाजी

कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जिरे घाला.

ते तडतडणे थांबल्यावर हळद आणि हिंग घाला.

ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा साठी फोडणीब्रेडची भाजी / ब्रेड उपमा साठी फोडणी

हिरवी मिरची, चिरलेला कांदा, कढीपत्ता घाला. नीट मिसळून घ्या आणि 3-4 मिनिटे किंवा कांदा थोडा रंग बदलेपर्यंत शिजवा.

ब्रेड उपमासाठी मिरची आणि कांदा परतणेब्रेड उपमासाठी मिरची आणि कांदा परतणे

चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो 3-4 मिनिटे किंवा थोडे मऊ होईपर्यंत शिजवा. .

साखर, मीठ घाला व चांगले मिसळा.

ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा साठी कांदा टोमॅटो परतणेब्रेडची भाजी / ब्रेड उपमा साठी कांदा टोमॅटो परतणे

ब्रेडचे तुकडे व कांदा-टोमॅटोच्या मिश्रणात नीट मिसळा.

ब्रेडची भाजी / ब्रेड उपमा साठी ब्रेडचे तुकडे घालणेब्रेडची भाजी / ब्रेड उपमा साठी ब्रेडचे तुकडे घालणे

अधूनमधून ढवळत 4-5 मिनिटे शिजवा.

कोथिंबीर घाला. चांगले मिसळा. स्टोव बंद करा.

Final mix for bread upmaब्रेडची भाजी - ब्रेड उपमा होत आला

ब्रेड उपमा तयार आहे. गरम सर्व्ह करा. सकाळच्या न्याहारीसाठी किंवा इतर वेळेला/जेवणासाठी वाढू शकता . ऑफिस किंवा शाळेच्या जेवणासाठी पॅक करायला सुद्धा हा छान पदार्थ आहे.

तयार ब्रेडची भाजी - ब्रेड उपमातयार ब्रेडची भाजी - ब्रेड उपमा

टिपा:

 • जर उपमा मऊ हवा असेल तर ब्रेडचे तुकडे घालण्यापूर्वी कांदा / टोमॅटोच्या मिश्रणात दोन चमचे पाणी घाला. जर तुम्ही वृद्ध लोकांसाठी हा उपमा बनवत असाल तर हे करता येईल.
 • ब्रेडचे तुकडे घालून मिसळल्यानंतर झाकण ठेवा म्हणजे उपमा मऊ राहील .
 • या ब्रेड उपमा डिशमध्ये तुम्ही कॅप्सिकम, हिरवे वाटाणे, चिरलेली गाजर, फुलकोबी इ. घालू शकता.

Related Pages to visit -

More Breakfast dishesGo to Breakfast Recipes page from Bread Upma

Go to Snack Recipes page from Bread Upma

Go to Vegetarian Recipes Home


New! Comments

Have your say about what you just read! Leave me a comment in the box below.